97632 06212 pwatsaru@yahoo.com

गोहत्या बंदी : सावरकर आणि विवेकानंद


वीर सावरकर म्हणालेत, ‘गाय हा एक उपयुक्त पशू. ती माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे. एक समर्थ समृद्ध राष्ट्र उभे करावयाचे असेल तर भाकड गाय अवश्य कापा.’ वीर सावरकर असे म्हणाले, त्यावेळी वणीला भरलेल्या सनातन धर्म परिषदेने ठराव केला होता, ‘आज जर पेशवाई असती, तर त्यांनी या धर्मबुडव्या सावरकराला हत्तीच्या पायाखाली चिरडला असता.’ सावरकर यावर एवढेच म्हणाले होते, ‘गाढवांच्या स्वप्नात पण उकिरडेच येतात.’