97632 06212 pwatsaru@yahoo.com

नमोजींची अद्भुत काव्यप्रतिभा


आपल्या आदरणीय नमोजींनी हिंदुस्थानचा राज्यकारभार हाती घेऊन एक वर्ष होऊन गेले आहे. या अल्पकाळातही नमोजींच्या अनेक गुणांचा आपणाला प्रत्यय आला आहे. नमोजींची कार्यकुशलता, कर्तव्यकठोरता, मुत्सद्दीपणा, निर्णयक्षमता, कष्टाळू वृत्ती, निःस्वार्थीपणा, परंपरेचा रास्त अभिमान, सचोटी अशा अनेक गुणांचे दर्शन आपणाला प्रत्यही घडत असते. मात्र त्यांचा एक गुण या सार्या सद्गुणांमागे काहीसा दुर्लक्षित राहिला आहे. नमोजी केवळ कविहृदयाचे नाहीत, तर खरोखरीच कवी आहेत. त्यांचा ‘आ आंख धन्य छे’ हा कवितासंग्रह आहे. आता ही गोष्टच आपणा मराठी जनांना ज्ञात आहे का? डॉ. गिरीश दाबकेजी यांनी लेख लिहिला (दीपलक्ष्मी दिवाळी 2013) म्हणून आपणाला महान कवी नमोजींचा परिचय झाला. तर माझं हे लिखाण त्यांच्याच लेखावर आधारित आहे.