97632 06212 pwatsaru@yahoo.com

किशोरीताई - विभास आणि बिभास


सोमवारची मध्यरात्र उलटून गेली होती. त्या अपरात्री एका मित्राचा मिस-कॉल बघितला आणि त्याला लगेच फोन केला. किशोरी आमोणकर गेल्या...त्याचा आवाज. मी ताडकन उठले. क्षणात माझं भावविश्व उन्मळून पडलं. मी काही क्षण सुन्न बसले आणि एबीपी माझावर त्यांच्या त्या धक्कादायक निधनाच्या बातम्या बघत बसले.