You have no items in your shopping cart.

You have no items to compare.

Search
The Unique Foundation/Other Books

मुलांनी फुलायचे तर

मुलांनी फुलायचे तर

Be the first to review this product

Rs 200.00

In stock

SKU: UNI0068

लेखिका--डॉ. आलेथा साॅल्टर
रुपांतर -- विनया मालती हरी
मूल्य --२०० /- पाने -२४८

Details

लहान मुलाला जगाविषयी प्रचंड कुतूहल असतं आणि असंख्य प्रश्‍नही पडतात. आपल्यालाही मुलाबद्दल कुतूहल आणि अनेक प्रश्‍न असतात. विशेषतः बालमन ही आणखीनच नाजूक व गुंतागुतीची गोष्ट! मूल वाढवताना, त्याला शिकवताना हे आणि असे बरेच प्रश्‍न समोर येतात - मूल का रडते? त्याचा त्रागा कसा हाताळायचा? ते शिकते कसे? मूल खेळते आणि नाटकं करते म्हणजे काय? ते इतरांशी व स्वतःशी संवाद कसा साधते? मुलामुलींना कोणते ताण येतात? ते ताण ती कशी हाताळतात? मुलाकडे आपण कसे पाहावे? मुलाशी संवाद कसा करावा? खाणे आणि आजार हाताळताना आपण काय घोटाळे करतो? मूल वाढवताना आपल्याला कोणते ताण येतात? ते आपण कसे हाताळावेत? त्याच्याशी बरोबरीने वागावे की अधिकारवाणीने? 'बक्षीस' आणि 'शिक्षा' ही पद्धत योग्य आहे का? भीती दाखवली तर मूल घाबरट होईल, नाहीतर ते बेबंद होईल का? बालकापर्यंत येऊन ठेपलेली हिंसा व लैंगिक अत्याचार याविषयी कसा संवाद साधावा? प्रसारमाध्यमांच्या गराड्यात सापडलेले बालमन स्वतंत्र विचार कसा करेल? अशा प्रश्‍नांचा आणि बालमनाचा सर्वांगाने वेध घेणारे हे पुस्तक. वैज्ञानिक संशोधन व रोजच्या जगण्यातील अनुभव यांना जोडणारी, सहज कळणारी आगळीवेगळी मांडणी. मुलांमधील चांगुलपणाच्या व सर्जनशीलतेच्या अफाट क्षमता फुलतील, असा विश्‍वास वाढवणारा मैत्रीपूर्ण संवाद म्हणजे हे पुस्तक.
  1. Be the first to review this product

WRITE YOUR REVIEW

Write Your Own Review

Only registered users can write reviews. Please, log in or register

Description

Reviews