97632 06212 pwatsaru@yahoo.com

घुमानचे तीर्थाटन


साहित्य संमेलनाचा बिग इव्हेंट पंजाब सरकारच्या मदतीने यशस्वीरीत्या पार पडला असे जरी म्हंटले जात असले, तरी प्रसारमाध्यमांत होत असलेलया टीकेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. नियोजनापासून ते आयोजनापर्यंतच्या अनेक तक्रारी आता हळूहळू पुढे येत आहेत. एव्हाना पंजाबवारी करुन साहित्ययात्री परतले असले, तरी साठ तास प्रवासाचा शीण अजून संपला नाही. असे असले, तरी नामदेव भक्त घुमानवारी करून बरंच काही कमावलं असल्याचा आव आणत जालियनवाला आणि अटारीचे किस्से सांगत सुटले आहेत.