97632 06212 pwatsaru@yahoo.com

बीज अंकुरे अंकुरे


मधुकर आरकडे गेले. ‘कवितारंग’मधील एक बिनीचा रंग अनंतात विलीन झाला. मधुकर आरकडे गेले, म्हणजे एक कवी गेला, एक गीतकार गेला, एक चित्रकार, एक गायक, एक संगीतकार, एक वादक, एक लेखक, एक शिक्षक, एक माणूस काहीही न सांगता सवरता अचानक निघून गेेला. (१५.३.२०१५, शनिवार, दुपारी तीन वाजता) जगाचा तडकाफडकी निरोप घेताना या कलाकाराने एकच केले - स्वतःबद्दलच्या अनेक आठवणी त्यांनी मागे ठेवल्या. आता त्यांचाच आधार घेत आपण मधुकर आरकडेंच्या स्मृतींना उजाळा द्यायचा. आपल्या हाती इतकेच उरले आहे.