97632 06212 pwatsaru@yahoo.com

अस्मितेच्या राजकारणाचा रंगमंचीय आविष्कार


मोठ्या शहरांतील इमारतींमध्ये अनेक भाषा बोलणारे, वेगवेगळ्या प्रदेशांतून आलेले लोक राहतात. वेगवेगळ्या भाषिक, जातीय स्तरातील तरुणांमध्ये होणारी लग्न इथं तुलनेनं सहिष्णुपणे हाताळली जातात. मात्र या इमारतींमध्ये राहणार्यात उच्च मध्यमवर्गाच्या अंतर्मनात मात्र धार्मिक अल्पसंख्याकांविषयी-विशेषत: मुसलमान समाजाविषयी, गरीब व्यक्तींविषयी दोष कसा ओतप्रोत भरलेला असतो याचं खूप यथार्थ दर्शन आपल्याला F-1/105 या आशुतोष पोतदारांच्या नवीन नाटकात मिळतं. वरवर पाहता घराला रंग देणं या अत्यंत निरुपद्रवी वाटणार्या/ विषयापासून नाटकाची सुरुवात होते. मात्र जसं जसं नाटक पुढे जातं, तसतसं महानगरीय भारतीय समाजातील गुंतागुंतीचं सामाजिक-राजकीय वास्तव ते आपल्यापुढे ठेवतं. राष्ट्र, राज्य पातळीवर चाललेला, वृत्तपत्रांतून चर्चिला जाणारा सामाजिक-राजकीय संघर्ष समाजाच्या दैनंदिन जीवनात, अत्यंत क्षुल्लक वाटणार्याा गोष्टीत कशा प्रकारे घडत असतो, हे सांगण्याची-दाखवण्याची मोठी ताकद साहित्यकृतींमध्ये असू शकते. आशुतोष पोतदार लिखित हे नाटक साहित्य वृत्तींमध्ये असणार्याय या ताकदीचा प्रत्यय आपल्याला घडवते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe