97632 06212 pwatsaru@yahoo.com

अलविदा जिजा


‘दलित महिलांनी प्रोसेसिंग केलेली डाळ लंडनच्या बाजारात जायला हवी’ हे एकनाथ आवाड यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न ते अनेकदा त्यांच्या भाषणांमध्ये बोलून दाखवत. आपल्या या स्वप्नपूर्तीसाठी आवाडांनी मराठवाड्यातल्या सात जिल्ह्यांमध्ये दलित-भूमिहीन कुटुंबांच्या बचत गटांचं जाळं विणलं. या बचत गटांची असोसिएशन करून पुढं एक बँक स्थापन केली. या बँकेतून अनेक दलित महिलांनी छोटे छोटे स्वयंरोजगार सुरू केले. अनेक स्वयंसेवी संस्था आज बचत गटांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. पण आवाडांची बचत गट चळवळीमागची प्रेरणा खास त्यांनी उभारलेल्या लढ्यांमधून निर्माण झाली होती