97632 06212 pwatsaru@yahoo.com

सामाजिक बहिष्काराची केस


‘मी सांगतो ते गुमान ऐका आणि गावातील लोकांच्या विरोधातील तक्रारी मागे घ्या व प्रकरण मिटवा. आणि मिटवायचे नसल्यास अजून पेटवा. आमच्याकडे दोन टँकर रॉकेल आहे व काडीपेटीही आहे. तुमच्यासह सारी वस्तीच पेटवून देऊ.’ असे धमकावणीचे उद्गार उस्मानाबाद जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे यांनी जिल्ह्यातील अनसुर्डा गावातील दलितांवर उच्चवर्णीयांनी टाकलेल्या सामाजिक बहिष्कार प्रकरणी घेतलेल्या ८ मे २०१५ च्या शांतता बैठकीत नायब तहसीलदार रामदासी यांच्या उपस्थितीत सर्वांसमक्ष जाहीरपणे काढले व जातीयवादी प्रवृत्तींना उघड चिथावणीच देण्याचे काम केले आहे असा पीडितांचा आरोप आहे.