97632 06212 pwatsaru@yahoo.com

आदरांजली सुमंत


वयाची ६० वर्षेही पूर्ण न करता यशवंत सुमंत हे जग सोडून गेले. गेले तीन-चार महिने त्यांच्या आजाराबद्दल विद्यापीठात गेले, की विद्यार्थ्यांकडून समजत होते. एकदा आमचा मोबाईलवरून संपर्कही झाला; परंतु ‘आता प्रकृती सुधारते आहे आणि उगीच हातातली कामे सोडून दगदग करत येऊ नका’ असे त्यांनी सांगितल्यावर मीही घरात शांत बसायचे ठरवले. त्यातच एकदा विलास सोनावणे त्यांच्या पत्नीसह घरी जाऊन भेटून आल्यानंतर तोही वृत्तान्त कळला होता. यशवंतच्या आजाराचे स्वरूप कसे गंभीर आहे हे कळले होते, पण स्टिरॉईड्स देऊन अत्यंत जलद गतीने प्रकृती पूर्ववत होते आहे असे कळले. मनातल्या मनात खूप शुभचिंतनपर विचार करून स्वतःला धीर दिला.