97632 06212 pwatsaru@yahoo.com

एडवर्ड गॅलेनो : इतिहासाचे स्मरण आणि विस्मरण हा व्यवस्थेचा भाग- दीपक बोरगावे


एडवर्डो गॅलेनो (Eduardo Galeano: September 1940 - April 2015) हे लॅटिन अमेरिकेतील (उरुग्वे) डाव्या विचारसरणीचे एक प्रमुख विचारवंत आणि साहित्यिक म्हणून परिचित आहेत. १३ एप्रिल २०१५ रोजी फुफ्फुसाच्या कर्करोगाने वयाच्या ७४ व्या वर्षी माँटेव्हिडिओ या त्यांच्या जन्मगावी त्यांचे निधन झाले. गॅलेनो यांनी पत्रकारितेबरोबर कथा, कविता आणि कादंबरी लेखन केले. Open Veins of Latin America: Five Centuries of Pillage of a Continent (1971; 2008) आणि Memory of Fire Trilogy (1983) ही त्यांची पुस्तके खूप गाजली. सुरुवातीला उरुग्वेमध्ये समाजवादी पक्षाच्या पत्रिकेतून त्यांनी लेखन सुरू केले. मार्चा या नियतकालिकाचे संपादक म्हणून पत्रकारितेला त्यांनी १९६० च्या दरम्यान सुरुवात केली. याच दरम्यान एपोका या दैनिकाचेही मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९७३ मध्ये लष्करी दलाने उरुग्वेचा ताबा घेतला आणि गॅलेना यांना तुरुंगात डांबण्यात आले. पण नंतर त्यांना तुरुंगातून पळून जाण्यास मुभाही देण्यात आली. अर्जेंटिना येथे भूमिगत राहून त्यांनी क्रायसिस (Crisis) नावाचं मासिक सुरू केलं. त्यांच्या Open Veins of Latin America या पुस्तकावर उरुग्वे, अर्जेंटिना आणि चिली येथील उजव्या विचाराच्या शासनांनी आणि लष्करी सत्ताधार्यांनी बंदी घातली होती. १९७६ मध्ये अर्जेंटिना येथे विलेडाचे मिलिटरी हिंसक राज्य आले तेव्हा गॅलेनोचे नाव मृत्युदंडाची शिक्षा झालेल्यांच्या यादीत समाविष्ट केले गेले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe