97632 06212 pwatsaru@yahoo.com

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन


अभिनेते आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य गजेंद्र चौहान यांची पुण्याच्या एफटीआयआय (फिल्म अॅिन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट)च्या नियामक मंडळाच्या संचालकपदी नियुक्ती केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन एका व्यक्तीविरुद्ध आणि एका संस्थेपुरते मर्यादित वाटत असले तरी देशातील शैक्षणिक संस्थांचे होणार्यार भगवेकरणाच्या विरोधातील एक राजकीय व लोकशाहीवादी भूमिका घेणारे आंदोलन आहे. फक्त गजेंद्र चौहान नाही तर नियुक्त केलेल्या इतर पाच व्यक्तींच्या विरोधातही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. या व्यक्तींनी साहित्य, कला, चित्रपट या क्षेत्रांत दिलेले योगदान व त्यांची या विषयाची जाण कितपत आहे यावर विद्यार्थ्यांनी प्रश्नट उपस्थित केले आहेत. सत्ताधारी पक्षाचा प्रचार, महाभारतात युधिष्ठिराची भूमिका निभावणार्याा व दूरचित्रवाहिनीवर रुद्राक्षाची जाहिरात करणार्यार व्यक्तीची या देशातील महत्त्वपूर्ण अशा संस्थेत संचालकपदी नियुक्त करणे गंभीर बाब आहे. एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षासाठी व विचारासाठी काम करणार्याि व्यक्तींची वर्णी संस्थेत लावली जात असेल तर ज्या संवैधानिक मूल्यांवर संस्थेची स्थापना झाली आहे, त्या मूल्यांचाच संकोच होत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe