97632 06212 pwatsaru@yahoo.com

शिवकर्तृत्वाने प्रेरित झालेला 'शिवनामा'


कथा, कादंबरी, कविता या विविध वाङ्मयप्रकारात ज्यांनी आपली लेखणी सहज चालविली ते सोलापूरचे कवी मुबारक शेख यांचा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने प्रेरित झालेला 'शिवनामा' मराठी माणसाच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही. एक तर शिवचरित्रच मुळी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यातील प्रसंग, पात्रे स्फूर्तिदायक आहेत. वेळोवेळी या प्रसंगांवर पात्रांवर बोलले लिहिले जाते. तात्पर्य, 'शिवचरित्र' हा विषय मराठी 'माणसाच्या जिव्हाळ्याचा, अभिमानाचा, आत्मसन्मानाचा आहे. त्याला मुबारक शेख या मुस्लीम कवीने हात घातला आहे. तितक्याच ताकदीने, आत्मविश्वासाने व अभिमानाने एक तर अत्यंत तटस्थतेने, देशकाल परिस्थितीचे भान ठेवून व निखळ वाङ्मयीन दृष्टिकोनातून कवीने हे लेखन केलेले दिसते.