97632 06212 pwatsaru@yahoo.com

महामंदी की युगांतकारी प्रक्रियेचा प्रारंभ?


2008 च्या जागतिक महाअरिष्टानंतर इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने एक प्रश्न विचारला होता, 'हे संकट येऊ घातले आहे हे कोणालाच कसे कळले नाही?' 'द गार्डियन' या वृत्तपत्राने डिसेंबर 2012 मध्ये जाहीर केले की शेवटी राणीला उत्तर मिळाले! तिने जेव्हा बँक ऑफ इंग्लंडला (भारतीय रिझर्व्ह बँकेप्रमाणे त्या देशाची केंद्रिय बँक) भेट दिली तेव्हा बँकेचे एक अर्थतज्ज्ञ सुजित कापडिया यांनी राणीसाहेबांना सांगितले की, 'वित्तीय अरिष्टे ही काहीशी भूकंप किंवा फ्लूच्या साथीप्रमाणे असतात; ती क्वचितच उद्भवतात आणि त्यांचा आधी अंदाज येत नाही!' या अफलातून बुद्धिमान उत्तराला राणीसाहेबांनी लवून कुर्निसात केला की नाही ठाऊक नाही. त्यांनी आणखी काही उपप्रश्न विचारले का आणि त्याला अशीच शाळकरी, मठ्ठ वा बेगडी 'वैज्ञानिक' उत्तरे दिली गेली का याचीही कल्पना नाही. मात्र हा 'अर्थतज्ज्ञ' किमान दोन बाबतीत नक्कीच उघडा पडला - एक तर, अनेक अर्थतज्ज्ञ, वित्तसम्राट आणि या क्षेत्रातील जाणकार यांनी वित्तव्यवस्था कोसळेल याविषयी अंदाज व्यक्त केले होते, पण तो त्याबद्दल अनभिज्ञ होता वा राणीला तसे सांगण्याचे त्याने टाळले. दुसरे, असे नैसर्गिक घडामोडीचे रूपक वापरण्यात यांत्रिक ठोकळेबाजपणा तरी आहे किंवा तद्दन चालबाजी. कारण ही समस्या पूर्णपणे मानवनिर्मित आहे, ती नैसर्गिक नाही. ती अटळ दैवलिखित नाही. तर ती एका विशिष्ट व्यवस्थेची निर्मिती आहे. मतभेद असतील पण तिच्याबद्दल शास्त्रीय विवेचन करणारी सिद्धांतने गेली किमान दीडशे वर्षे या पृथ्वीतलावर नांदत आहेत. पण हेदेखील या अर्थतज्ज्ञाच्या गावी नसेल असे कसे शक्य आहे? अर्थात, भांडवलशाहीचा उदय आणि विकास, तसेच तिच्यातील संकटे आणि समस्या हे सारेच 'नैसर्गिक' आहे अशी वैचारिक समर्थने तिच्या जन्मापासून सुरू आहेत - आणि ती तिच्या मृत्यूपर्यंत सुरू राहतील. पण एक नक्की, असे 'अर्थतज्ज्ञ' सत्तास्थानी असल्यावर पुनःपुन्हा आर्थिक अरिष्टे ओढवणारच असे लोकांना वाटले तर आश्चर्य नाही!

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe