97632 06212 pwatsaru@yahoo.com

मासिक पाळी, जननक्षमता आणि स्त्रिया स्वातीजा मनोरमा


1 ते 15 मार्चच्या 'वाटसरू'मधील विशेष लेख 'स्त्रीची मासिक पाळी : समतेची होळी' हा सरिता आवाड व आनंद करंदीकर या लेखकद्वयीचा लेख वाचला. ह्या विषयाला ह्या मंचावर ठेवले ह्याबद्दल लेखकद्वयीचे अभिनंदन! 'वाटसरू'चे विशेष आभार. लेखात शास्त्रीय आणि स्त्रियांच्या असमानतेला व दुय्यमत्वाला मुळापासून हादरे देणारे विचारप्रवर्तक काहीतरी असेल ह्या अपेक्षेने लेख वाचायला घेतला. सुरुवात ही विनोदिनी काळगी यांनी संपादित केलेल्या 'सहज शिक्षणाची प्रयोगशाळा' ह्या पुस्तकातील उद्धृत केलेल्या एका उतार्याच्या अनुषंगाने होते, त्या एका उतार्याचा धागा धरून हा लेख पुढे जातो. अर्थातच ही अशी माहिती, चुकीचा समज समानतेला घातक व मारक आहेत आणि त्या गैरसमजातून समानतेची होळी होते, असे काहीसे प्रतिपादन सुरुवातीच्या काही परिच्छेदांमध्ये होते. मधला काही भाग वगळता अगदी सारांशापर्यत सहज शिक्षणाच्या ह्या परिच्छेदाला केंद्रिभूत धरून हा लेख लिहिला गेला आहे आणि इथेच नेमकी गोची आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe