97632 06212 pwatsaru@yahoo.com

आठवणी गुरुवर्य कलाम सरांसोबतच्या शेवटच्या दिवसाच्या...


आठ तास झालेत आम्ही शेवटचे बोललो त्याला, झोप येत नाहीये आणि आठवणी ओघळतायत, कधी अश्रूंतून... 27 जुलै 2015 चा आमचा दिवस एकत्र सुरू झाला. दुपारी 12 वाजता जेव्हा आम्ही गोहत्तीच्या विमानात आपापल्या जागांवर बसलो. डॉ कलामांची 1-अ आणि माझी 1-क. त्यांनी गडद रंगाचा कलाम सूट परिधान केलेला. मी कौतुकाने म्हणालो, ‘छान आहे रंग.’ मला तेव्हा थोडीच कल्पना होती की त्यांच्या अंगावर पाहण्याचा हा शेवटचा रंग