97632 06212 pwatsaru@yahoo.com

ही लढाई आमच्या वर्गांमधूनच सुरू होते


फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफ.टी.आय.आय.)च्या विद्यार्थ्यांचा लढा आता नवव्या आठवड्यात पोहचला आहे. पाच मथळ्यांहून अधिक मथळे मिळवलेली बातमी ही बातमी राहत नसते, ती शिळी बाब होते! बातम्यांचे ग्रहण करमणूक म्हणून केले जात असते त्या काळात सार्वजनिक अवकाशात मुद्दा कितीही तळपत असला तरी बातमीचा गाभा आपण हरवून बसलेलो असतो. आणि नेमका याच गोष्टीचा फायदा आधुनिक, विचारसरणीदृष्ट्या जाचक आणि निवडणुकीच्या लोकशाहीचे दावे करणारी सरकारं (साम्राज्यवादी ब्रिटन (1947 पूर्वीचा), आजचा भारत) नागरी संघर्षावर पाणी फिरवण्यासाठी, तो आतून खिळखिळा करण्यासाठी आणि अंततः नष्ट करण्यासाठी घेऊ पाहत असतात.