97632 06212 pwatsaru@yahoo.com

स्त्रिया आणि अभ्यासक्रम


एकोणिसाव्या शतकातील युरोपमधील शिक्षणविषयक चर्चा ही प्रायः शिक्षणाच्या प्रसाराविषयी अधिक झाली. सार्वत्रिक शिक्षणाद्वारे आधुनिक शिक्षणाचा प्रसार ही उगवत्या भांडवलदारी समाजाची अत्यावश्यक गरज होती. परंतु औद्योगिक क्रांतीनंतरही दीर्घ काळ शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या भूमिकेसाठी भांडवलदार वर्ग तयार नव्हता. शिक्षणातून कामगार वर्गात विद्रोही मानसिकता तयार होईल आणि हा वर्ग बंड करेल ही भीती वारंवार व्यक्त केली गेली होती. असे धोरण हे भांडवलशाहीच्या विकासास अनुकूल नसले तरी भांडवलशाहीला कोणताही धोका राहू नये, या बचावात्मक भूमिकेतून हे धोरण स्वीकारले गेले होते. आधुनिक शिक्षणातील या सुप्तशक्तीचे योग्य असे व्यवस्थापन केल्यानंतरच (1870 च्या आसपास) शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची भूमिका घेतली गेली. त्यासाठी विविध प्रकारच्या व्यूहनीतींद्वारे शिक्षणव्यवस्थेचे व्यवस्थापन केले गेले. या व्यवस्थापनाचा भाग म्हणून शिक्षणव्यवस्थेला अर्थपुरवठा करण्याचे धोरण पत्करून या व्यवस्थेला तिच्या रचना, आशय व स्वरूपासह संपूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणात राज्यसंस्थेने आणले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe