97632 06212 pwatsaru@yahoo.com

'आदर्श' धर्मनिरपेक्षता कोणती?


६६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उत्सवी धामधुमीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिल्लीच्या विविध भागांत प्रसिद्धीफलक लावले. ह्या फलकांवर भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका छापली होती. लक्षात घेण्याजोगी बाब अशी, की मोठ्या अभिमानाने भारत हे 'समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य' असल्याचं घोषित करणार्या या प्रास्ताविकेत फेरफार करण्यात आले होते. फलकांवर छापलेल्या प्रास्ताविकेतून 'समाजवादी धर्मनिरपेक्ष' हे शब्दच गायब होते! याबाबत चहूकडून विचारणा झाली असता मंत्रालयाच्या नाकावरची माशीसुद्धा हलली नाही. त्यानंतर दुसर्याच दिवशी शिवसेनेचे खासदार व सेना-भाजप युतीचे लोकसभा सदस्य संजय राऊत यांनी “भारत हे 'हिंदुराष्ट्र' असल्याने घटनेच्या प्रास्ताविकेत सुधारणा करून त्यातील 'समाजवादी धर्मनिरपेक्ष' हे शब्द हटवण्याची गरज आहे” इति मुक्ताफळं उधळली. केंद्रातील भाजप सरकारने राऊतांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही हे सुदैवच म्हणायचं. दरम्यान माहिती व प्रसारण मंत्रालयाने 'प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी घटनेच्या प्रास्ताविकाची मूळ प्रत वापरणं उचित वाटल्याचं' स्पष्टीकरण देऊन सारवासारव केली ('समाजवादी धर्मनिरपेक्ष' हे शब्द तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधींच्या आदेशावरून १९७४ सालच्या ४२ व्या घटनात्मक दुरुस्तीद्वारे प्रास्ताविकेत समाविष्ट करण्यात आले होते). 'मंत्रालयाने ह्या कृत्याची जबाबदारी झटकली असती तरी विषयाला पूर्णविराम मिळाला असता असं वेळोवेळी मोदी सरकारची कड घेणार्या समाजघटकांचं म्हणणं पडलं. या सगळ्या गदारोळातील दुर्दैवाची गोष्ट ही, की समाजातील हिंदू बहुसांख्यिकतावादी विचार-वर्तनाचे हल्ले परतवून लावत धर्मनिरपेक्ष राजकारणाच्या बाजूने सातत्याने उभं राहणार्या पुरोगामी वर्गाने निषेधाचे क्षीण सूर आळवण्यापलीकडे फार काही केलं नाही. अशा पूर्वनियोजित 'चुकी'बद्दल मोदी सरकारला साफ माफ करून टाकणार्या सामान्य जनतेचं औदासिन्य तर त्याहून धक्कादायक आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe