97632 06212 pwatsaru@yahoo.com

पटपल्ली : २१ व्या शतकातील महाड


पटपल्ली दलित बाधित न्याय पोराता (संघर्ष) समिती ही पटपल्ली गावातील दलितांच्या हक्कांसाठी संघर्ष करणार्या संघटनांची एक आघाडी आहे. ६ ऑगस्ट रोजी या समितीने त्सुंदुर दलित हत्याकांडाला पंचवीस वर्षे झाल्याच्या निमित्ताने पेब्बेरुहून पटपल्लीपर्यंत ८ किलोमीटर अंतराचा मोर्चा काढण्याचे ठरवले. या मोर्चाची आणखी एक तातडीची पार्श्वभूमी म्हणजे या आघाडीच्या वतीने गेले दोन महिने सुरू असलेल्या आंदोलनाकडे शासन पूर्णपणे डोळेझाक करत होते. ८ जुलैपासून साखळी उपोषणे, धरणे आदी कार्यक्रम चालू होते. उपोषणाचे स्थळ पेब्बेरु मंडल कार्यालयाच्या अगदी जवळ असूनही शासन ढिम्म हलत नव्हते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe