97632 06212 pwatsaru@yahoo.com

कोसळलेले सोव्हिएत मॉडेल (9) अग्रदलीय मार्क्सवादाला रजा द्या!


संजीव चांदोरकर सोव्हिएत मॉडेल कोसळण्यामागील कारणांची चर्चा केल्यानंतर पुन्हा तत्त्वज्ञानात्मक मांडणीत वेळ का काढायचा असा प्रश्न वाचकांच्या मनात येऊ शकतो. पण सोव्हिएत मॉडेल कोसळण्यास कारणीभूत झालेल्या प्रक्रिया व त्या अर्थव्यवस्थेत तयार झालेल्या शक्ती मुळात तेथे तयारच का झाल्या असाव्यात याची चर्चा केल्याशिवाय या विषयाची सांगता करणे चुकीचे ठरेलच, पण हे टाळण्यासाठी भविष्यामध्ये समाजवाद्यांनी नक्की काय केले पाहिजे याचे मार्गदर्शनदेखील होणार नाही. सोव्हिएत युनियनचे पतन झाल्यानंतर अनेक डाव्या विचारवंतांनी अशी मांडणी केली होती की बोल्शेव्हिक क्रांतीसाठी त्या काळातील रशियातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती पुरेशी परिपक्वनव्हती. मार्क्सवादी विचारधारेत काही वैगुण्य नाही, तर ते विचार चुकीच्या देशात, अपरिपक्व परिस्थितीत लागू करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याची परिणती सोव्हिएत मॉडेल, कालांतराने कोसळण्यात झाली. अशा पद्धतीच्या विश्लेषणाच्या मुळापर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न केला नाही तर आपण एक गंभीर ऐतिहासिक चूक करू. सोव्हिएत मॉडेल अग्रदलीय मार्क्सवादावर आधारित होते. अग्रदलीय मार्क्सवाद हे मूळ मार्क्सवादाचे भ्रष्ट रूप आहे. आणि या अग्रदलीय मार्क्सवादाचा जोरकस प्रतिवाद केला गेला नाही तर भविष्यात ज्या ज्या देशात त्याचा अमल करायचा प्रयत्न होईल तेथे तेथे तेच परिणाम दिसतील जे सोव्हिएत मॉडेलमध्ये आपल्याला दिसले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe