97632 06212 pwatsaru@yahoo.com

आरक्षण ही काही दारिद्र्यनिर्मूलन योजना नाही!


गुजरातमधील पाटीदारांचे आरक्षणासाठीचे आंदोलन हे आगामी बिहार विधानसभा आणि गुजरातमधील नागरी स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाहिले पाहिजे. गुजरातमध्ये याआधी भाजप आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात झालेली आंदोलने संख्येच्या पातळीवर एवढी मोठी नव्हती आणि ती तितक्याशा गांभिर्याने कधीही घेतली गेली नाहीत. आता मात्र गुजरातमध्ये कुणीतरी मोदींच्या विरोधात किंवा त्यांच्या नियंत्रणाबाहेर असलेले आंदोलन करतंय म्हणून अनेकांना आनंद झाल्याचे दिसते. मात्र पाटीदार आंदोलन आणि त्या आंदोलनाचा नेता म्हणून पुढे आलेला हार्दिक पटेल हा पूर्णपणे मीडिया हाईप किंवा माध्यमांचा बागुलबुवा आहे हे स्पष्टपणाने ध्यानात घेतले पाहिजे. माध्यमांनी मोठे केलेल्या कोणत्याही आंदोलनाचे आयुष्य हे अत्यंत अल्प आणि मर्यादित असते. यामध्ये 'मीडिया' असं म्हणताना ‘सोशल मीडियाचा’देखील समावेश अंतर्भूत आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe