97632 06212 pwatsaru@yahoo.com

चित्रपट 'ख्वाडा'चे दिग्दर्शक भाऊसाहेब कर्हाडे यांच्याशी बातचीत


चित्रपट 'ख्वाडा'चे दिग्दर्शक भाऊसाहेब कर्हाडे यांच्याशी बातचीत मुलाखतकार : श्रीकांत ढेरंगे प्रथमतः मला ख्वाडा या शब्दाबद्दल सांगा? - ख्वाडा या शब्दाचे तसे अनेक अर्थ आहेत. ते वेगवेगळे अर्थ मी सांगत नाही. चित्रपट पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना त्याचा उलगडा होईल. प्रत्येक घटनाप्रसंगातून ते अर्थ प्रतीत होत जातील. ख्वाडा या शब्दाचा मुख्य अर्थ म्हणजे अडथळा. सिनेमाचं शीर्षकच चित्रपटाच्या आशयविषयाची पकड घेणारं असावं या अर्थानेही या शीर्षकाची आम्ही निवड केली.