97632 06212 pwatsaru@yahoo.com

मराठी विज्ञान साहित्य : सापेक्ष समाजशास्त्रीय चिकित्सा


सचिन गरुड आधुनिक विज्ञानाचा उदय युरोपात सतराव्या शतकात झाला आहे. परंतु विज्ञानाचा उदय युरोपातील सामाजिक-आर्थिक क्रांतीच्या परिवर्तनकारी इतिहासाचा भाग म्हणून पाहावयास हवे. सरंजामशाहीच्या विरोधातून विकसित झालेल्या आधुनिक भांडवलशाही विकास प्रक्रियेच्या समग्र आकलनातूनच विज्ञान-तंत्रज्ञानाचा आढावा किंवा यथार्थ अन्वयार्थ घेतला जाऊ शकतो. सरंजामशाही सामाजिकदृष्ट्या सरंजामदार आणि भूदास उत्पादन संबंधावर उभी होती. ती शेतीकेंद्री अर्थव्यवस्था होती आणि युरोपीय धर्मसत्ता किंवा चर्च या सरंजामशाहीच्या पायावरच उभी होती. प्रबोधन युगात तर्कशुद्ध, बुद्धिप्रामाण्यवादी वैज्ञानिक-तात्त्विक विचारप्रणालींनी सरंजामशाहीच्या सामाजिक,आर्थिक आणि धार्मिक पायाला मुळातून हादरा दिला. त्यातून धर्मसत्ता, अध्यात्म यांच्या शासन-शोषणकारी स्थिर भूमिकेच्या विरोधात विज्ञान-तंत्रज्ञानाचे परिवर्तनशील द्वंद साकारले. विज्ञानवादी तत्त्वज्ञानाने आधुनिक भांडवलशाहीला पूरक लोकसत्ताक सामाजिक-राजकीय व्यवस्थाबदलाला गती दिली.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe