97632 06212 pwatsaru@yahoo.com

पेशावर ः एक हुरहुर लावणारी आठवण


एखाद्या बातमीत जेव्हा जेव्हा पेशावरचा उल्लेख येतो तेव्हा तेव्हा माझ्या मनात दडलेली हुरहूर जागरूक होते - मी बेचैन होतो. माझ्या मनःचक्षूंसमोर एका उतारवयाच्या दाढीवाल्या व्यक्तीचा प्रसन्न चेहरा ओझरतेपणाने तरळतो व लगेच नाहीसा होतो. तसे मला कोणाचेही चेहरे लक्षात ठेवणे जरासे कठीण वाटत असले तरी जुने संभाषण व घटना मला नेहमीच चांगल्या आठवतात.