97632 06212 pwatsaru@yahoo.com

इतिहास अभ्यासक्रमाची शवचिकित्सा


इतिहास हा सामाजिक शास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तो अत्यंत संवेदनशील व सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असणारा विषय आहे. इतिहासातील नवे नवे परिवर्तन, संशोधन याचा अंतर्भाव अभ्यासक्रमात करून नव्या विकृती, विसंगतीशी व पुनर्लेखनाशी नव्या पिढीचा परिचय करून देणे ही या विषयाची जबाबदारीच आहे. उत्तरोत्तर आता सामाजिक शास्त्रांचे व त्यातल्या त्यात इतिहास या विषयाचे महत्त्व वाढत चालले आहे, या बदलाची दखल वृत्तपत्रांनी घेतलेली आहे. आता उच्च कोटीची बुद्धिमत्ता असलेले लाखो विद्यार्थी विज्ञान शाखा न निवडता जाणीवपूर्वक कला शाखा निवडत आहेत. अशा वेळी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांतील इतिहास अभ्यासमंडळाची भूमिका अधिक महत्त्वाची व परिणामकारक सिद्ध होऊ शकते. इतिहास हा विषय महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, नेट व सेट, विविध स्पर्धा परीक्षांसाठी अनिवार्य केलेला आहे. त्यामुळे हजारो नवतरुण इतिहास विषयाकडे आपल्या उज्ज्वल करिअरचा एक राजमार्ग म्हणून पाहत आहेत. थोडक्यात सर्व विद्यापीठांतील इतिहास विषयाला चांगले दिवस आलेले आहेत.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe