97632 06212 pwatsaru@yahoo.com

मृतकांच्या वहिवाटीचा रस्ता


जानेवारी 1949मध्येच ओबिला नड्यूम केंद्रीय विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी नियुक्त केलं गेलं. इतक्या झटपट म्हणजे अपेक्षेपेक्षा खूपच आधी त्याला ही संधी त्याच्या डोक्यात बर्याच सुपीक कल्पना होत्या आणि त्या राबविण्याची नामी संधी या निमित्ताने त्याला मिळाली होती. अत्यंत उमेदीनं त्यानं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि त्याच्या सेवा पुस्तिकेत 'उत्तम शिक्षक' असा शेराही अधिकार्यांनी नोंदवला होता. म्हणूनच त्याला जिम्मेदारीच्या या उच्च पदावर बढती मिळाली होती. अल्पशिक्षित पुराणमतवादी, जुन्या सहकार्यांना तो सर्रास धारेवर धरत असे.