97632 06212 pwatsaru@yahoo.com

सौदा


म्हातारी रेमिजिआ खोगिरावरील मांड पक्की रोवूनच तिचा छोटासा चेहरा उंचावून म्हणाली, “माझ्याकडे पापक्षालनगृहातील मृतात्म्यांसाठी एक निकेलचे नाणे आहे. त्यामुळे फेलिपा, पाऊस येईल असं वाटतं.” फेलिपाने धूम्रपान जारी ठेवले व काहीही प्रतिक्रियावजा उत्तर दिले नाही. दुष्काळाविषयी लोकांची खूपच शोकाकुल बोंबाबोंब तिच्या कानावर आली होती...तिने शेवटी नजर उंचावली आणि अख्खे आकाश निरखून पहिले. आभाळ निरभ्र होते, अति उंचावर विस्तारले होते आणि त्यात एखादीदेखील सावली दिसत नव्हती. सूर्याचे प्रखर तेजस्वी ऊन पाहून संताप अनावर होत होता.