97632 06212 pwatsaru@yahoo.com

विकास... भकास


आटपाटनगर होते. तसे अस्ताव्यस्त होते, पण त्यात एक ‘हिरवे’ बेट होते. बेटावर वस्ती होती. वस्तीमधली माणसे कप्प्यांमध्ये राहत. पाणी, वीज, हिरवळ, स्वच्छता सगळे होते. माणसं सतत कम्प्युटरवर काम करायची. बायका ब्युटी पार्लर चालवायच्या आणि शब्दकोडी सोडवायच्या. लहान मुलं शिस्तशीर. युनिफॉर्म घालून वस्तीतच शाळेत जायची. सगळे कसे आखलेले नेमके होते. त्या बेटावर कोणी कोणाशी बोलत नसे, खेळत नसे. मुलंसुद्धा कम्प्युटरवर सगळे खेळ आपले आपण खेळत. बायका फार तर वाहिन्यांमधल्या वहिन्यांशी बोलत. आजी-आजोबा नव्हतेच. पण वाहिन्यांमध्ये दिसायचे. सगळे कसे निरोगी, तकतकीत जाहिरातीसारखे दिसायचे.