97632 06212 pwatsaru@yahoo.com

पॉर्न, मी आणि समाज


पार्न (पॅार्नोग्राफी, pornography) याचा विकिपीडियामधील अर्थ “is the portrayal of sexual subject matter for the purpose of sexual arousal” आहे. मला पॉर्नची ‘कामोत्तेजक सार्वजनिक अभिव्यक्ती’ अशी व्याख्या योग्य वाटते. या व्याख्येतील प्रत्येक शब्द आवश्यक आहे आणि एकत्रितपणे ते पुरेसे आहेत. खाजगीत, उदाहरणार्थ शयनगृहात, केलेला व्यवहार पॉर्न नाही. लैंगिक कृतीबद्दलाचा माहितीपट, लैंगिक शिक्षणाचा अभ्यासवर्ग म्हणजे पॉर्न नाही कारण ते कामोत्तेजक नसतात. अभिव्यक्तीचे सर्व प्रकार, जर ते कामोत्तेजक आणि सार्वजनिक असले तर ते पॉर्नमध्ये अंतर्भूत होतात. यांच्यामधे चित्रे, शिल्प, छायाचित्रे, संगीत, नृत्य, कविता, कादंबरी, चलतचित्र इत्यादी सार्या अभिव्यक्तींचा समावेश होतो. या लेखात मुख्यत: माहिती नभोमंडळात पाहायला मिळणार्या पॉर्न चलतचित्रांचा उहापोह आहे.