97632 06212 pwatsaru@yahoo.com

पोर्नोचे गारदी करती आयुष्याची बरबादी


पोर्नोग्राफीबद्दल सध्या बरीच चर्चा चालू आहे. पण बर्याचजणांना, पोर्नोग्राफी म्हणजे काय हेच माहीत नसते. तर पोर्नोग्राफी म्हणजे संभोगाचे अत्यंत तपशीलवार चित्रण ज्याचा एकमेव उद्देश लैगिक उत्तेजना देणे हाच असतो. हे चित्रण पूर्णपणे भावनाविरहीत असते. तसेच ते लैंगिक क्रिया ठळकपणे दाखविणारे असते. हा संभोग स्त्री-पुरुष, स्त्री-स्त्री, पुरुष-पुरुष, स्त्री-कुत्रा, स्त्री-घोडा असा काहीही असू शकतो. छापील स्वरूपातील पोर्नोग्राफी साधारणपणे एकोणिसाव्या शतकातसुद्धा झाली. 1970-80 च्या दरम्यान पोर्नोग्राफिक व्हिडीओज् आले. इंटरनेट पोर्नोग्राफी 1990 च्या सुमारच रूढ झाली. इंटरनेट पोर्नोग्राफीच्या समोर बाकीचे सर्व प्रकार अगदीच साधे, बाळबोध आणि लिंबूटिंबू वाटावेत असे आहेत. या लेखात इंटरनेट पोर्नोग्राफीचा विचार केला आहे.