97632 06212 pwatsaru@yahoo.com

उद्याच्या आजोबांची जबाबदारी


समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अडथळा ठरणार्या पारंपरिक विचारांची लोकशाही चौकटीत चिकित्सा करणार्यांच्या एकापाठोपाठ एक होणार्या हत्येनंतर सर्वच सुज्ञ नागरिकांच्या मनात भीतीची धडकी भरल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलाच्या प्रशासकीय नेतृत्वात नुकताच खांदेपालट झालेला आहे. 1990 च्या दशकात विशेषतः मुंबई व मोठ्या शहरात खंडणीबहाद्दरांकडून केल्या जाणार्या हत्यासत्रामुळे आर्थिकदृष्ट्या श्रीमंतांमध्ये अशीच भीतीची धडकी भरली होती, पण त्या काळी खंडणीबहाद्दरांना सामान्यांची सहानुभूती नव्हती; युती, आघाडी सरकार अगर इतर विरोधी पक्षाचे पाठबळ नव्हते. देशातील कोणतीही समस्या सोडविण्यासाठी थर्ड डिग्री हा एकमेव उपाय माहीत असलेल्या पोलिसांनी पिस्तुलाच्या साहाय्याने 700 पेक्षा जास्त गुंडांचा एन्काऊंटर करून आर्थिक श्रीमंतांना भयमुक्त केले होते. त्यातून एन्काऊंटर स्पेशालिस्ट तयार झाले. पिस्तुलाच्या नळीद्वारे त्यांना निव्वळ शौर्यपदकच नव्हे तर लक्ष्मीही प्रसन्न झाली. 85 टक्क्यांपेक्षा जास्त तथाकथित फेक एन्काऊंटर होऊनही न्यायव्यवस्था अगर मानवी हक्क आयोगांना पत्ता लागला नाही. तशीच भीतीची लहर आता वैचारिक श्रीमंतांमध्ये निर्माण झालेली आहे. खंडणीबहाद्दर म्हणून गोळीने टिपले गेलेले अट्टल गुन्हेगार कोण होते? ही खरे तर घाटी व कोकणातील बंद पडलेल्या गिरणीतील कामगार, चुकीच्या शेतीधोरणामुळे देशोधडीला लागलेले शेतकरी, निवडणुकीच्या काळात प्रचार करण्यासाठी मसलमॅन म्हणून वापरलेले झोपडपट्टीत राहणारे परप्रांतीय, गावगाड्यातील जातिव्यवस्थेला कंटाळून शहरात आलेले बलुतेदार व अशाच वर्गातील लोक यांची भ्रमनिरास झालेली पोरं होती. बेकारी, जागतिकीकरणामुळे निर्माण झालेली आर्थिक विषमता, बदललेल्या मूल्यव्यवस्थेमुळे निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती प्रभावशून्य बनलेली कालबाह्य क्रिमिनल जस्टिस सिस्टिम या सर्व बाबींची ही पोरे बळी ठरलेली होती.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe