97632 06212 pwatsaru@yahoo.com

कला, साहित्य आणि संघ


राष्ट्रीय साहित्यसेवक संगर काय उसळला अन् राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गडबडला काय! कधी नव्हे तो संघ सटपटला, लटपटला अन् धडपडला. लेखणीने लाठीला ललकारले आणि संघ सादळला. एक तर अत्यंत अहिंसक, अनाक्रमक निषेधाचा मार्ग; दोन, सारेजण मान्यताप्राप्त, प्रतिष्ठित व सुविद्य-सुसंस्कृत. एकापाठोपाठ एक साहित्यिक पुरस्कार परत करू लागताच संघाला प्रतिवादाला मुद्देच सुचेनात. काँग्रेसचे कपट, डाव्यांचे कारस्थान, पुरोगाम्यांची फूस, मोदी विरोधकांचा डाव असे भलतेसलते संशय संघाच्या गोटातील प्रवक्ते करीत सुटले; पण साहित्यिकांच्या अंगाला काहीही चिकटेना. संघ चक्क हरला. लेखणीपुढे लेचापेचा झाला. सहा इंची प्लॅस्टिकची कांडी जाडजूड दंडापेक्षा ताकदवान निघाली.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe