97632 06212 pwatsaru@yahoo.com

भांडवलशाहीची अरिष्टातून पुनर्रचना


भांडवली अर्थव्यवस्था व जागतिक भांडवली अर्थव्यवस्थेतील सध्याचे अरिष्ट यावर इंग्रजीत निरनिराळ्या मार्क्सवाद्यांनी ठिकठिकाणी जे विश्लेषणात्मक लिखाण केले आहे त्यांचे समर्थपणे आकलन करून दत्ता देसाईंनी लिहिलेला ‘जागतिक अरिष्टाचे अंतरंग’ (वाटसरू, 16 ते 30 सप्टेंबर 2015) हा लेख अगदी स्वागतार्ह आहे. मार्क्सवादातील निरनिराळ्या प्रवाहातील विश्लेषकांचे इंग्रजीतील लिखाण आपल्याला उपलब्ध असणे हे आता पूर्वीइतके अवघड राहिलेले नाही हा इंटरनेटच्या वाढत्या वापराचा एक फायदा आहे. त्याचा पूर्ण फायदा घेऊन पद्धतशीररीत्या या लिखाणाचा साक्षेपी मागोवा घेत दत्ता देसाईनी त्याचे सार, त्यातील विविध बारकाव्यांसह समर्थपणे आपल्यापुढे मांडले आहे. दत्ता देसाईंचे हे व अशा प्रकारचे लेख हे मार्क्सवादी प्रबोधनातले स्वागतार्ह पुढचे पाऊल आहे.