97632 06212 pwatsaru@yahoo.com

दोन विचारधारांचा संघर्ष


‘प्रतिगामित्व आणि पुरोगामित्व’ या संज्ञांची काहीजणांकडून सध्या केली जात असलेली व्याख्या ‘हिंदुत्व आणि हिंदुत्वविरोध’ अशी केली जात आहे. या संज्ञांची अशी विशिष्ट धर्माधारित व्याख्या करणे, हे त्या संज्ञांच्या संदर्भात संकुचित, विपरित आणि आशयअर्थघातक ठरते. म्हणून या दोन्ही संज्ञा आणि तत्संबंधित ‘प्रतिगामी आणि पुरोगामी’ ही दोन्ही विशेषणे बाजूला ठेवून प्रस्तुत विषयाची चर्चा करणे युक्त ठरावे. आदिमानवापासून प्राकृतिक अशा पशुतुल्य, रानटी, हिंस्त्र आदी प्रवृत्तींविरुद्ध सांस्कृतिक अशी परस्पर संवादी संबंध अधिष्ठित, हिंसाविरोधी शांततापूर्णतेकडे चाललेली वाटचाल हा मानवी समाजाचा चालता-बोलता इतिहास आहे.