97632 06212 pwatsaru@yahoo.com

आइन्स्टाईन यांच्या विचारविश्वात बुधाचा प्रवेश


वृत्तपत्र वाचणार्या, रेडिओ ऐकणार्या अथवा टीव्ही पाहणार्या सर्व व्यक्तींना अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे नाव माहीत असतेच असते. त्यांच्या वयस्क छबीतील अस्ताव्यस्त केसांतून प्रकटणारे E=mc2 हे पदार्थविज्ञानातील सूत्रदेखील काहीजणांना पाहून अथवा ऐकून माहीत असते. ते व्हायोलिन उत्तम वाजवीत असत, याचीही माहिती काहीजणांच्या मनात घर करून असते. आयुष्यभर कायम जागतिक शांततेचा उद्घोष करणार्या या ‘शांतिदूता’ने आपले शांततेचे पंख ‘शांतीच्या स्मृतिस्तंभा’च्या पायथ्याशी उतरवून ठेवत बाह्या सरसावून अमेरिकेने अण्वस्त्रे बनविली पाहिजेत असे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना 1939 मध्ये पटविले, या व्यंगचित्राचीही कुणाकुणाला कुणकुण असते. परंतु अण्वस्त्रे बनविण्याचा आग्रह धरणे ही स्वतःच्या हातून घडलेली सर्वात मोठी घोडचूक असल्याची खंत त्यांनी आयुष्यभर वागविली, हे मात्र अनेकांना माहीत नसते. आइन्स्टाईन तत्त्ववेत्तेही असल्याने त्यांची अनेक वचने खूप प्रसिद्ध झाली. ती अनेकांना माहीत असतात. उदाहरणार्थ, धर्माची जाणीव नसणारे विज्ञान पंगु असते आणि विज्ञानाचा स्पर्श नसणारा धर्म आंधळा असतो. परंतु आइन्स्टाईन यांची देवा-धर्माची कल्पना खूप वेगळी आहे; तिचा पाया स्पिनोझा यांच्या तत्त्वविचारात आहे; त्यातल्या त्यात सोप्या भाषेत सांगायचे तर त्या कल्पनेचे साम्य ‘या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?’ या गीतातील ईश्वराच्या कल्पनेशी आहे. कुतूहल वाटावे अशा वास्तव घटना आणि प्रसंग यातून कुतूहल शमविण्याची जी प्रेरणा मिळते ती आणि त्यांचा ईश्वर एकच आहे. अशा ईश्वरी अस्तित्वाचा त्यांनी आग्रह धरला आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe