97632 06212 pwatsaru@yahoo.com

आत्मानुभूतीच्या जखमा उजागर करणारी कविता


डी. के. शेख यांचे आजपावेतो एकूण आठ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. अनेक वाङ्मयीन नियतकालिकांमधून त्यांची सातत्याने त्यांची कविता येत राहिली आहे. त्यामुळे कवितेच्या प्रांतात डी. के. परिचित झाले आहेतच. 'पागल पोरांच्या भंकस कविता' या त्यांच्या काव्यसंग्रहाने वादळ उठवले होते, ती कविता बेकारीच्या वेदनेतून उठलेली एक भयाण किंकाळी