97632 06212 pwatsaru@yahoo.com

आरएसएस आणि भाजपचे बेगडी संविधान प्रेम


9 डिसेंबर 1946 रोजी सुरू झालेले संविधान निर्मितीचे कामकाज 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान अंगीकृत करून संपले. संविधान सभेने स्वीकृत केलेले हे संविधान मग 26 जानेवारी 1950 पासून देशभर लागू करण्यात आले. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन असा साजरा केला जातो. यंदा मात्र भाजपाच्या सरकारने बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीवर्षानिमित्त 26 नोव्हेंबर 2015 रोजी 'संविधान दिन' पाळण्याचा कार्यभाग उरकून घेतला. खरं तर बाबासाहेबांचा जन्म 1891 सालचा म्हणजे त्यांची 125 वी जयंती ही 14 एप्रिल 2016 रोजी व म्हणूनच 125 वे जयंती वर्ष हे 2016-17 असे असायला हवं. पण आरएसएसला बाबासाहेबांना 'हायजॅक' करण्याची, त्यांना 'भगवं' करण्याची एवढी घाई झालीय की त्यांनी भाजपाकरवी एक वर्ष आधीच हा उपक्रम सुरू केलाय. 19 फेब्रुवारी 1906 रोजी जन्मलेल्या आरएसएसचे गुरू गोळवलकरची जन्मशताब्दी ही 'सामाजिक समरसता' वर्ष अशी साजरी करताना मात्र आरएसएस व भाजपाने अशी घाईगडबड केली नाही. ती बरोबर 2006-07 साली साजरी केली.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe