97632 06212 pwatsaru@yahoo.com

एक निराळी प्रेमकहाणी


तुम्हाला आता विश्रांतीची गरज आहे, चार वर्षं दिवसरात्र तुम्ही कल्पनाला काय हवं नको ते सारं पाहिलंत. - मी फोनवरून लतीफना सांगितलं 31 ऑक्टोबरच्या संध्याकाळी. त्या दिवशी पहाटे लतीफनी विद्युतदाहिनीमध्ये कल्पनाला अंतिम निरोप देऊन बेचाळीस वर्षांच्या प्रेमकहाणीचा शेवट केला होता. “तुम्हाला सगळं सांगायचय मला आणि दाखवायचंदेखील आहे काही, म्हणजे मग तुम्हाला कळेल तिने माझ्यासाठी काय केलं होतं.” लतीफ मला सांगत होते. आदल्या दिवशी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी कल्पना अखेरचा श्वास घेऊन मृत्यूच्या अधीन झाल्या होत्या.