97632 06212 pwatsaru@yahoo.com

'चांगले पॉर्न' ही चैन कोणाच्या जिवावर?


'वाटसरू'च्या 1 ते 15 डिसेंबर 2015 च्या अंकात आनंद करंदीकर यांनी 'पॉर्न, मी आणि समाज' या टिपणात वाईट पॉर्नवर चांगले पॉर्न हा उपाय आहे अशी भूमिका मांडली आहे. सामाजिक वास्तवातील एखाद्या पैलूचे विश्लेषण करताना त्याचे राजकीय अर्थशास्त्र विचारात घेतले पाहिजे हे बेसिक पथ्य करंदीकरांनी पाळलेले नाही. 'पॉर्न' हा एक धंदा आहे, सेक्स इंडस्ट्रीचा भाग आहे व 'पॉर्न'साठी कॅमेर्याला सामोरे जाणारे लोक पैशासाठी हे करतात. पोट भरण्यासाठी इतर कोणता सन्माननीय मार्ग नसणारे किंवा 'इझी-मनी'च्या रोगाला बळी पडणारे जसे वेश्याव्यवसायात उतरतात तीच गोष्ट 'पॉर्न'साठी कॅमेरा समोर उभे रहाणार्यांची असते.