97632 06212 pwatsaru@yahoo.com

पर्युषणपर्वातले पाच दिवस


वाटसरू (16 ऑक्टोबर 2016) मधील 'पर्युषणपर्वातले पाच दिवस' या दत्ता भगत यांचा लेख वाचला. कोणातरी अज्ञात कल्पनारम्य ईश्वराच्या कृपेच्या आशीर्वादाच्या आशेवर जगण्याच्या जीवनपद्धतीला धर्म मानण्याच्या परंपरेच्या विरोधात बोलणारा जैन विद्यार्थी होतो. महाविद्यालयाच्या शिक्षणकाळापासूनच जैनमंदिरात मूळ तसेच प्राचीन जैनशास्त्रांच्या आधारे बोलत असे. त्या शास्त्रांच्या गाथांमध्ये दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या विवेचनात धर्माबद्दलच्या ह्या खोट्या मान्यतेचा कडाडून निषेध केला आहे. परंतु हजारो वर्षांपासून जैन समाज अशा काल्पनिक ईश्वर, देवी-देवतांच्या चमत्कारावर विश्वास ठेवणार्या राजांच्या राज्यसत्तेत पीडित राहिला आहे. त्यामुळे क्रमाने राज्यसत्तेच्या अनुरूप धर्माच्या मान्यतेत परिवर्तन होत आले आहे.