97632 06212 pwatsaru@yahoo.com

अ. भा. विप्र


कीव, करुणा, दया, सहानुभूती आदी भावनांना पात्र असणारी संघटना म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. बिचारी खूप तळमळ आणि प्रामाणिकपणा दाखवत विद्यार्थ्यांच्या राजकारणात उतरायची. पण विद्यार्थी तिला कायम झिडकारत. ते तुपकट, शुद्ध संभाषण, तो पवित्र सात्विक चेहरा आणि ताई-दादा-भैय्या-दीदी या नात्यांनी घट्ट विणलेली वागणूक कोणालाही गिळगिळीत वाटायची. पत्रके काढण्यात मात्र हुशार, प्रसिद्धी मिळवण्यात वाकबगार आणि वक्तृत्व स्पर्धांत जोरदार अशीही एक बाजू या संघटनेची असे. कोणी कितीही झटो पण ती ब्राह्मणी झाक काही लपायची नाही. संघातून थेट कॉलेजात अन् विद्यापीठांत आलेले आणि घरी संघीय वातावरणात वाढलेले विद्यार्थी आवर्जून अभाविपमध्ये दाखल होत. अल्पसंख्याक असणे किती लागट असते याचे दु:ख बिचारी ही संघटना फार काळ भोगत राहिली. परंतु भाजपला सत्तेत मोठा वाटा मिळू लागला तशी ही संघटना चेहर्यामोहर्याने अब्राह्मणी, डावपेचात आणि कटकारवायांत पटाईत व पैसा, खर्च यात तरबेज होत चालली. भाजपच्या बळामुळे या विद्यार्थी संघटनेचे बळ वाढले. खालून वर वाढत जाण्याचा क्रम या संघटनेने गिरवला नाही. भाजपमुळे ही संघटना जेवढी वाढली तेवढी जनसंघामुळे नव्हती. म्हणून आता भाजपची सत्ता देशावर गाजू लागताच अभाविपच्या अंगावर मूठभर मांस चढले. दादागिरी करायला प्रेरणा मिळाली. अशाच धटिंगणपणामुळे अभाविपने हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात एका विद्यार्थ्याचा बळी घेतला. संघ परिवार आंबेडकरांचे शतकोत्तर पंचविसावे जन्मवर्ष साजरे करीत असताना 'आंबेडकर स्टुडंटस् असोसिएशन'चा रोहित वेमुला हा कार्यकर्ता व संशोधक विद्यार्थी प्राणत्याग करता झाला.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe