97632 06212 pwatsaru@yahoo.com

रोहित वेमुलाची आत्महत्या : एक अन्वय


रविवार, दि. 17 जानेवारीला रोहित वेमुला या पंचवीस-सव्वीस वर्षांच्या दलित युवकाने हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये हॉस्टेलमध्ये मित्राच्या खोलीत पंख्याला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. (हा गळफास तो ज्या 'आंबेडकर स्टुडंटस असोसिएशन', एएसए या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता होता त्या संघटनेच्या झेंड्याने त्याने लावून घेतला.) सभोवतालच्या विखारी असहिष्णु राजकारणाने घेतलेला हा आणखी एक बळी आहे. दोन वेगवेगळ्या राजकीय विचारसरणींच्या विद्यार्थी संघटनांमधल्या संघर्षातून ही घटना अशा कडेलोटापर्यंत गेली असे सकृतदर्शनी सांगण्यात येत असले तरी त्यामागे असलेले विविध प्रवाह, इतिहास आणि सध्याच्या वास्तवात शैक्षणिक क्षेत्रात इतरही ठिकाणी घडत असणार्या घटना समजून घेणे महत्वाचे आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe