97632 06212 pwatsaru@yahoo.com

मूल्यात्मकतेचा मानदंड


सर जाऊन 25 जानेवारीला एक वर्ष होत आहे. त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी मनात दाटून येतात. ते जायच्या आधी दोनेक महिन्यांपूर्वी सांगलीला त्यांच्या घरी मी व वृषाली त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांची कन्या रेवती त्यांचा हात धरून हॉलमध्येच चालवत होती. ‘सर, तब्येत कशी आहे?’ मी विचारलं.