अमृता शेर-गील भारतात परत आली त्यावेळी भारतीय चित्रकलेत ‘बंगाल स्कूल’ आणि ‘बॉम्बे स्कूल’ प्रस्थापित होऊन सर्वमान्य झालेच होते. स्वदेशी चळवळीतून आलेले राष्ट्रप्रेम, ब्रिटिश विरोध म्हणून भारतीय परंपरेचा अनुनय आणि अनुकरण हेच कलेचे मापदंड झाले होते. प्रत्यक्ष जीवन, सभोवतालचा परिसर, भारतातल्या विविध परंपरा यांची दखल न घेता उठावदार दिसणार्या सर्वमान्य झालेल्या अजिंठा, लघुचित्र, वेरुळ याच परंपरेला जोडून घेण्याचा प्रत्येक कलाकार प्रयत्न करत होता. कलकत्ता, मुंबई, चेन्नई आणि लाहोरपर्यंत कलाकारांना भौतिक परिस्थितीचे भान नव्हते.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.