97632 06212 pwatsaru@yahoo.com

अ.भा.वि.(द्रु)प.


हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातला रोहित वेमुला एका क्रौर्याचा बळी आहे. हे क्रौर्य खास संघीय आहे. कठोरता आणि क्रौर्य यांत तसा फार फरक नसतो. पण कठोरता शिस्तीशी जोडली गेली आहे. त्याचबरोबर ती सहनशीलता, एकाग्रता, प्रयत्नांची पराकाष्ठा, चारित्र्याची जपणूक यांनाही जोडणारा एक भाग आहे. मनाने केेलेला ठाम निर्धार कधीकधी कठोरपणाशी जाऊन भिडतो. उदाहरण घ्यायचे झाल्यास लग्नानंतर पत्नीला टाकून देण्याचा कठोरपणा नरेंद्र यांनी दाखवला किंवा कांशीराम यांनी राजकीय कार्यासाठी घर सोडले, ते कधी घरच्यांना न भेटण्यासाठीच. किंवा गांधीजी कस्तूरबांवर आपले हट्ट लादत आणि बा अनिच्छेने निरनिराळे प्रयोग सोसत. तेव्हाही गांधींचा कठोरपणा दिसे. पण या तिन्ही उदाहरणांत क्रौर्यही आहे. भावनांचा लवलेशही नाही. समोरच्याला काय वाटेल आणि समोरच्याची तयारी किती याचा मुळीच विचार न करता आपलाच हेका राबवून घ्यायचा हा कठोरपणा होय. त्यात क्रूरताही येतेच. प्रतिज्ञेचे पालन, आचाराचा आविष्कार आणि वर्तन सातत्याचे भवितव्य राखण्यासाठी केलेला कठोरपणा कोणाचा अपमान करतो, कोणाची भावना चुरगाळतो अथवा कोणाची सहनशीलता ताणतो, यांकडे कठोर माणसांचे लक्ष नसते. गळा दाबणार्याला आपल्या हातांना बसणारे झटके जाणवत नसतील काय? शरीरावर घाव घालणार्याला वेदनांनी कळवळणारा चेहरा दिसत नसेल काय?

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe