97632 06212 pwatsaru@yahoo.com

होय, उमर माझा मुलगा आहे!


'होय, उमर माझा मुलगा आहे' माझं मन मला सांगतं आहे. मी त्याला कधी भेटलेलो नाही किंवा त्याला ओळखतही नाही. पण तरीही तो माझा मुलगा आहे असं मला म्हणावंसं वाटतंय. माझी मुलगी अशा वयात प्रवेश करते आहे जेव्हा तरुण मनाला स्वची जाणीव होऊ लागते. उमरने तो टप्पा ओलांडला आहे आणि तो कधीच एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व बनला आहे. जगातील शोषितांचा कळवळा आणि अन्यायाविरोधात पेटून उठलेलं व्यक्तिमत्त्व.