97632 06212 pwatsaru@yahoo.com

शेरेबाजी टाळण्याची गरज!


'वाटसरू' (16 ते 29 फेब्रुवारी 2016) मधील प्रवीण घोडेस्वार ह्यांनी घेतलेली छाया दातार यांची विशेष मुलाखत वाचली. ह्या मुलाखतीत पुरुष आणि स्त्रिया हे शब्द जसे वापरले आहेत, त्यातून असे जाणवते की, जणू काही हे शब्द वैश्विक आहेत आणि त्यांचा एकच एक अर्थ लागतो. अस्मितेच्या राजकारणात दलित स्त्रीवादाने जाणे हे चूक आहे असे प्रतिपादन मुलाखतीत येते आणि ते योग्यच आहे. परंतु दलित स्त्रीवादाविषयी जे थोडक्यात मांडले आहे ते मात्र दिशाभूल करणारे, गैरसमज करणारे वाटले. ह्या विषयावर शर्मिला रेगे ह्यांनी 'इकॉनॉमिक अॅण्ड पॉलिटिकल वीकली' (फेब्रुवारी 5, 2000) ह्या अंकामध्ये डिस्कशन ह्या सदराखाली साद्यंत लेख लिहिला आहे - 'खरा स्त्रीवाद आणि दलित स्त्रिया : नकार आणि दूषणे देणार्या लिप्या किंवा संहिता' (पृ. 492-495). जिज्ञासूंनी जरूर हा लेख पाहावा.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe