97632 06212 pwatsaru@yahoo.com

ब्राह्मणी अरेरावी


27 नोव्हेंबर 2015 रोजी इंडिया टुडेच्या डेलीओ या इंटरनेट आवृत्तीमध्ये बेल्जियममधील घेंट विद्यापीठातील प्राध्यापक एस. एन. बालगंगाधर यांचा एक लेख प्रसिद्ध झाला. लेखाचे शीर्षक होते, 'भारतामध्ये कोणती असहिष्णुता वाढते आहे?' हैदराबादमधील इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटीमधील (यापुढे फक्त आयएफएलयु) एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये बोलताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी अत्यंत शिवराळ भाषा वापरल्याने त्यांच्याविषयी जी संतापाची भावना पसरली तिचा प्रतिवाद ते या लेखात करतात. आपल्या वक्तव्याबद्दल अपराधभाव असणे तर दूरच, ते पुन्हा एकदा आंबेडकरांसंबंधीचा आपला तिरस्कार इथे व्यक्त करतात आणि आंबेडकरांच्या ज्ञानाची तुलना केवळ आलिया भटच्या ज्ञानाशीच होऊ शकते असे मत नोंदवतात. खरे तर, आंबेडकरांबद्दल सहज बोलता बोलता शिवराळ भाषा वापरली जावी ही गोष्ट काही देशात नवी नाही, पण कदाचित पहिल्यांदाच एका विद्यापीठाच्या सार्वजनिक विचारमंचावर इतक्या अश्लाघ्य भाषेत बोलले गेले असेल. एकीकडे सत्ताधारी उजवी राजवट आंबेडकरांबद्दल असीम प्रेम आणि अपार भक्तिभाव व्यक्त करणार्या गप्पा ठोकत असताना, हिंदू संस्कृती व परंपरेच्या महानतेबद्दल सिद्धान्तन करणारी एक व्यक्ती कुठल्याही दडपणाशिवाय आंबेडकरांचा अवमान करू धजते ही गोष्ट रोचक ठरावी.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe