97632 06212 pwatsaru@yahoo.com

डॉ. आंबेडकरांची अल्पसंख्याकविषयक भूमिका


भारतात ब्रिटिशांच्या वसाहतवादी आक्रमणानंतर 1900 पासून अल्पसंख्याकां’च्या संकल्पनेने जोर धरला आणि ‘अल्पसंख्याक’ ही स्वातंत्र्यपूर्व भारतातील राजकीय आंदोलनातील एक प्रमुख समस्या बनली. ब्रिटिशपूर्व भारतात अशी समस्या आणि विभिन्नधर्मीय जमाती, जाती, भाषिक आणि सांस्कृतिक किंवा प्रादेशिक जमाती यांच्यामध्ये अशी विभागणी नव्हती. भारतांत बौद्धधर्मीय, जैनधर्मीय, वीरशैव लिंगायत, शैव, वैष्णव, कबीरपंथीय, शीखधर्मीय, झरत्रुष्टधर्मीय, ख्रिस्ती, इस्लामधर्मीय, धर्म आणि संप्रदाय होते. भाषिक-वांशिक जमाती होत्या. जंगलनिवासी वन्य जमाती, त्यांचे त्यांचे प्राचीन आणि स्थानिक धार्मिक आचार होते. श्रमण आणि शाक्त परंपरा, वैदिक धर्म आणि त्यांच्या श्रद्धा आणि देवदेवता होत्या. ‘मुसलमान’ हे धर्माच्या नावाने ओळखले जात नव्हते. त्यांना अरब, तुर्क, मोगल, पठाण, बलुची, ताजिकी, अझबैगी, मकागाणी, इराणी, तुराणा इत्यादी वांशिक नादाने ओळखले जाई. मूळ इतिहासात (वसाहतवादी आणि ब्राह्मणी सोडून) त्यांचे वर्णन तसेच आहे. सर सय्यदसारख्या वरिष्ठवर्णीय अशरफ वर्गाचे राजकारण सुरू होईपर्यंत मुसलमानही आपण ‘अल्पसंख्य’ आहोत, असा शब्दप्रयोग करीत नव्हते. भारतात ‘धर्म’ हा एकजीव, एकजिनसी, सर्वसमावेशक ‘समूह’ किंवा ‘अखंड आणि एकावयवी’ आचार-विचारप्रणाली म्हणून कधीच अस्तित्वात नव्हता (रिलीजन्स मोनोलिथ). भारतातील धर्माचे स्वरूप, मग बौद्ध, जैन, वैदिक, वीरशैव, शीख असो, हे बहुपेडी आणि अनेकात्म (प्लुरल) होते. प्रत्येक धार्मिक समूहात विविध परंपरा, प्रसंगी परस्परविरोधी आचार-विचार होते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe